
अॅपलच्या आयफोन ५ ने बाजारात येण्यापूर्वीच विक्रीचे विक्रम नोंदविले असले तरी आता जे या फोनचा वापर करू लागले आहेत त्या युजरकडून येणार्या तक्रारींचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच युजरनी आयफोन ५ चे मॅप सदोष असल्याच्या तक्रारी केल्यानंतर आणि त्या खर्या असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कंपनीचा सीईओ टीम कुक याने ग्राहकांची जाहीर माफी मागितली होती. या नाट्याला फारसा कालावधी लोटला नसतानाच आता आयफोन ५ मधील कॅमेराही सदोष असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.