बॉलीवूडमधील अभिनेत्री श्रीदेवी हिने १९८० च्या दशकात तिच्या अदाकारीने सर्वानाच घायाळ केले होते. त्यामुळेच तिचे त्याकाळी किती जन तरी दिवाने झाले होते. १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये श्रीदेवीने ‘इंग्लिश विन्ग्लीश’ सिनेमाद्वारे पुनरागमन केले आहे. तिच्या या पुनरागमनामुळे तिच्या जीवनातील काही जुने राजही उघड झाले आहेत. श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरशी विवाह करण्यापूर्वी डान्सिंग स्टार मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात पडली असल्याचे उघड झाले आहे.
मिथुन व श्रीदेवीच्या प्रेम काहनीला १९८० च्या दशकात ‘जाग उठा इंसान’ या सिनेमापासून सुरुवात झाली होती. त्यावेळी मिथुन हा विवाहीत होता. मिथुनची पत्नी योगिता बाली हिला मिथुन व श्रीदेवीच्या अफेयर सुरु असल्याची माहिती मिळाली. तेंव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मिथूनने श्रीदेवीला नंतरच्या काळात दूर करणेच पसंत केले.
त्यानंतर श्रीदेवीने मिथुन सोबतचे सर्व नाते तोडून काही दिवसानंतर बोनी कपूरशी विवाह केला होता. बोनीची ती दुसरी पत्नी आहे. सध्या ती दोन मुलीचा आई असून सुखी संसारात ती व्यस्त आहे. सध्या ती ‘इंग्लिश विन्गलिश’ सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहे.