अमेरिका करणार व्हिसा शुल्कवाढीचा पुनर्विचार: क्लिंटन

न्यूयॉर्क: अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर व्हिसाच्या शुल्कात केलेल्या वाढीबद्दल अमेरिका पुनर्विचार करेल; असे आश्वासन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांना दिले.

अमेरिकेने मक्सिकोच्या सीमा सुरक्षा खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी एच१ बी व्हिसाचे शुल्क वाढवून २ हजार डॉलर्स; तर एल १ व्हिसाचे शुल्क २ हजार ७०० डॉलर्स केले आहे. या शुल्कवाढीमुळे कमी कालावधीसाठी अमेरिकेत येणारे नोकरदार; विशेषत: सोफ्टवेअर अभियंत्यांना मोठा फटका बसत आहे.

सोमवारी क्लिंटन आणि कृष्णा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत कृष्णा यांनी ही बाब अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिली.

भारतीय कंपन्या आणि अभियंत्यांची अडचण अमेरिकेने समजून घेतली असून व्हिसा शुल्कवाढीबरोबरच एकूणच व्हिसा प्रक्रियेची पुनर्रचना अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर करण्यात येईल; असे क्लिंटन यांनी सांगितले.

Leave a Comment