मीरत: देशातील अनेक छोट्या विभागातून स्वतंत्र राज्याची मागणी होत असताना त्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करून या आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांची पुनर्रचना व्हावी; अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी केली.
देशात अनेक ठिकाणी स्वतंत्र राज्याची मागणी होत असून तेलंगणसारख्या ठिकाणी या समस्येने हिंसक वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय दृष्टीने अथवा मनमानीपणाने स्वतंत्र राज्याची मागणी मान्य करणे अथवा नाकारणे अयोग्य आहे. त्या त्या भागातील नागरिकांची भावना, सद्यस्थिती आणि आवश्यकतांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविणार्या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. या आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांची पुनर्रचना व्हावी; अशी अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली.
आर्थिक सुधारणांच्या विरोधात सरकार आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतून बाहेर पडून आक्रमक भूमिका घेणार्या तृणमूल काँग्रेसला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामावून घेणार का; या प्रश्नावर; यासंबंधी तृणमूल अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीच निर्णय घ्यायचा आहे; असे उत्तर सिंह यांनी दिले.