सेमिफायनलाचा मार्ग भारतासाठी खडतरच

भारताने रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्च्या सामन्यात दमदार विजय मिळवून टी-२० च्या विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाण्याचे आवाहन जिवंत ठेवले आहे. तरीपण सेमिफायनलमध्ये जाण्याचा हा मार्ग अजूनही खडतरच आहे. मंगळवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्च्या सामन्यात भारताला त्यांना पराभूत करावे लागणार आहे. अन्यथा जर…. तरच्या समीकरणावर अवलंबून राहवे लागणार आहे.

त्यासोबतच भारतीय संघाला पाकविरूद्ध ऑस्ट्रेलिया या लढतीकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. पाक संघ जर ऑस्ट्रेलिया संघाला मोठ्या फरकाने पराभूत करण्यास यशस्वी ठरला तर त्याना सहज सेमिफायनलमध्ये जाता येईल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन सामन्यात पराभूत झाल्याने सेमीफायनलच्या रेस मधून हा संघ बाहेर पडला आहे. जर ऑस्ट्रेलियाने पाकला पराभूत केले तर त्यांना सहजपणे सेमीचा मार्ग खुला होईल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवला तर भारत, पाक व आफ्रीका एक-एक विजय मिळवल्याने ज्याची धावगती सरस आहे तो संघच सेमीफायनलमध्ये पोहचेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पाकवर विजय मिळवला व भारताने आफ्रिकेला नमवले तर भारत सहज सेमिफायनल मध्ये पोहचेल. सध्य स्थितीत ऑस्ट्रेलिया एक नंबरवर आहे तर नेट रनरेटवर एक विजय मिळवीत पाक दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघाने ऐन मोक्याच्या क्षणी रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकला धूळ चारत विजय मिळवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्च्या सामन्यात भारताला केवळ विजयच मिळवावा लागणार आहे तरच सेमीफायनलमध्ये पोहचता येणार आहे.

Leave a Comment