मॉन्सून अभ्यासण्यासाठी घेतला जाणार सागरतळाचा वेध

मुंबई:पावसाचा लहरीपणा समजून घेण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून सागर तळाचा शोध घेण्याचा निर्णय शास्त्रज्ञांनी घेतला आहे; अशी माहिती भू विज्ञान विभागाचे सचिव शैलेश नायक यांनी दिली.

समुद्राच्या तळाशी हजारो वर्षापूर्वीच्या जल वायू परिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी अरबी समुद्रात मुंबईपासून ४०० सागरी मैलांवर असलेल्या लक्ष्मी बेसिन या ठिकाणी खड्डे खणून समुद्र तळाचे नमुने घेण्याचे काम केले जाणार आहे. हे काम ३ महिने चालणार असून या नमुन्यांच्या विश्लेषणातून हजारो वर्षापूर्वीच्या मॉन्सूनच्या इतिहासाची माहिती संकलित केली जाईल; असेही नायक यांनी सांगितले.

या प्रकल्पामध्ये समुद्र तळाप्रमाणेच हिमालयाच्या उत्पत्तीचा अभ्यासही केला जाणार आहे.

Leave a Comment