राणी एकटीच करतेय प्रमोशनचे काम

बॉलीवूडमधील खंडाला गर्ल म्हणून परिचित असलेली राणी मुखर्जी सध्या एकटीच तिच्या बहुचर्चित ‘अईय्या’ या सिनेमाचे प्रमोशन करीत आहे. या सिनेमातील मल्याळी हिरो पृथ्वीराज मात्र सध्या प्रमोशनच्या कामापासून दूर आहे. त्यामुळे सर्वचजनाना पृथ्वीराजला दूर ठेवून राणी एकटीच प्रमोशनचे काम का करीत आहे हा प्रश्न सतावत आहे.

बहुचर्चित ‘अईय्या’ या सिनेमातून राणीला खूप काही अपेक्षा आहेत. त्यामुळे तिने प्रमोशनसाठी स्वताला झोकून दिले आहे. सध्या ती एकटीच या कामात रात्र न दिवस झोकून देत असते. या सिनेमात हॉट राणी सोबत ठुमके लावणारा मल्याळी हिरो पृथ्वीराज सध्या गायब आहे. यशराज बॅनरच्या आगामी सिनेमाच्या शूटमध्ये तो बीजी असल्याचे समजते. शूटमध्ये बीजी असल्याचे कारण जरी सांगितले जात असले तरी यामागील खरे कारण मात्र दुसरेच असल्याचे समजते.

या सिनेमाचे सर्वच श्रेय राणी मुखर्जीला मिळावे यासाठी ही केविलवाणी धडपड सुरु आहे. या सिनेमात राणीचा रोल प्रमुख असून या सिनेमाचे कथानक तिच्या भोवतीच फिरत आहे. त्यामुळेच तिने या प्रमोशनच्या कामात लीड घेतला आहे. शूटचे काम संपल्यानंतर लवकरच पृथ्वीराज प्रमोशनच्या कामात जॉईन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment