भर दिवसाही दिसणार धूमकेतू

रशियन खगोलशास्त्रज्ञ नेवास्की आणि नोव्हीकॉनॉक या जोडगोळीने तीन दिवसांपूर्वी जो धूमकेतू इंटरनॅशनल सायंटिफिक ऑप्टीकल नेटवर्कच्या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमधून टिपला तो आयरन धूमकेतू पुढील वर्षाच्या अखेरीस पृथ्वीवासियांना दर्शन देणार असून तो दिवसाही दिसू शकेल असे या दोघांचे म्हणणे आहे.

तीन दिवसांपूर्वी या जोडगोळीने या धूमकेतूचे फोटेा घेतले आहेत. त्यांना हे शेंडेनक्षत्र प्रथम दिसले तेव्हा ते पृथ्वीपासून ६२५ दशलक्ष मैल दूर होते तर सूर्यापासूनचे त्याचे अंतर होते ५८४ दशलक्ष मैल. कर्कराशीच्या नक्षत्रसमूहात असलेला हा धुमकेतू १८.३ तेजस्वितेने चमकत होता. सूर्याजवळ तो २८ नोव्हेंबर २०१३ ला येणे अपेक्षित आहे. त्यावेळी तो सूर्यापासून आठ लाख मैलांवर असेल आणि त्याची तेजस्विता उणे तीन इतकी असेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे तो सूर्याप्रमाणेच तळपेल आणि दिवसाही दिसू शकेल. अर्थात दिवसा तो अगदी थोडा वेळच दिसेल. 

विशेष म्हणजे १६८० सालात दिसलेल्या धुमकेतूप्रमाणेच हा धुमकेतू असून या दोन्ही धुमकेतूत अनेक समान गोष्टी आहेत. कदाचित हे दोन्ही धुमकेतू एकच असावेत असाही तर्क लढविला जात आहे. सूर्यापासून दूर जाताना या धुमकेतूला मोठी शेपूटही दिसू शकणार आहे. सूर्यास्तानंतर एखाद्या सर्चलाईटप्रमाणे ही शेपूट दिसेल. आक्टोबर २०१३ ला तो सिंह राशीत येईल आणि त्यावेळी सूर्यास्तानंतर तो नुसत्या डोळ्यांनीही पाहता येईल तर डिसेंबरमध्ये अत्यंत प्रखर तेजाचा हा धुमकेतू सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अशा दोन्ही वेळी दर्शन देईल असे सांगण्यात येत आहे.

 

Leave a Comment