फेसबुकची गिफ्ट सेवा सुरू

फेसबुकचे युजर आता आपल्या सख्या सोबत्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि अगदी स्पेशन व्यक्तीला त्यांच्या वाढदिवशी, सणावारी अथवा आणखी विशेष कारणांसाठी फेसबुकच्या माध्यमातून गिफ्ट पाठवू शकणार आहेत. फेसबुकने गिफट या नावानेच ही सेवा सुरू केली आहे. गुरूवारी सुरू करण्यात आलेल्या या सेवेत सध्या फक्त चॉकलेटस, कॉफी, सॉक्स अशा मर्यादित वस्तूंचाच समावेश असला तरी लवकरच हवी ती गिफ्ट पाठविण्याची सुविधा युजरला मिळणार आहे. अँड्राॅईड मोबाईल फोन्स किंवा फेसबुक  वेबसाईटवरून या भेटी पाठविता येणार आहेत.

त्यासाठी साईटच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करायचे असून ज्यांना भेट पाठवायची त्यांच्या नावासमोर, फोटोसमोर कोणती भेट पाठवायची त्याचा उल्लेख करता येईल. ज्याला भेट पाठवायची त्याचा पत्ताही अॅड करायचा. अर्थात ज्या व्यक्तीला भेट पाठवायची त्याला ही भेट बदलून स्वतःच्या पसंतीची भेट घेण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. 

फेसबुकने या नव्या सुविधेमुळे ई कॉमर्स क्षेत्रातही पदार्पण केले असून त्यांनी १८ मेला अधिग्रहण केलेल्या कर्मा या सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनीचेच हे नवे रूप आहे. कर्मा हे  गिफ्टसाठीचे मोबाईल अॅप असून कर्माचा प्रमुख ली लिडेन हाच या नव्या फेसबुक गिफ्टचाही प्रमुख आहे. त्याच्या मते गिफ्ट हा संवादाचाच एक भाग आहे आणि तो ज्याच्याशी साधला जातो तेथे अतूट नाते निर्माण होते.

 

Leave a Comment