पॉपस्टार शाकिराकडे गुडन्यूज

याच्याकडून प्रसिद्ध कोलंबियन गायिका शाकिरा गर्भवती असून, तिला डोहाळे लागले आहेत, अशी माहिती खुद्द शाकिरानेच दिली आहे. स्पेनचा फुटबॉलपटू गेरार्ड पिक्यू तिच्या होणाऱ्या मुलाचा पिता आहे.

तरुणींना लाजवेल असे सौंदर्य आणि नृत्य करणार्‍या ३५ वर्षीय शाकिराने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे, की आमच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी गेरार्ड आणि मी अतिशय उत्सूक आहोत. आमच्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान क्षणाला प्राथमिकता देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासाठी येत्या काही महिन्यांमधील प्रमोशनल अॅक्टिव्हिटीज पुढे ढकलण्यात येणार आहेत.

शाकिराने ’ड्यू डेट’ अद्याप जाहीर केलेली नसून लास वेगास येथील संगीत महोत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. २००६ मध्ये शाकिराच्या ’हिप्स डोण्ट लाय’ या गाण्याने आंतरराष्ट्रीय उच्चांक मोडले. यासोबत शाकिराचा आंतरराष्ट्रीय पॉप जगात उदय झाला. तेव्हापासून तिने एकापेक्षा एक  सरस गीते सादर केली आहेत. २५ वर्षीय गेरार्ड बार्सिलोना फुटबॉल क्लबचा खेळाडू आहे. २०१० मध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते.