जुना मोबाइल द्या, एटीएम मधून कॅश घ्या

लंडन – तुमचा मोबाइल जुना झाला आहे आणि मार्केटमध्ये त्याला रिसेल व्हॅल्यूही मिळत नसेल तर चिंता करू नका. लवकरच असे विशिष्ट एटीएम मशीन येणार आहे की, ते तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाइलच्या बदल्यात रोख कॅश अर्थात रूपये देणार आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कॅलिफोर्नियातील एक कंपनी याबाबत संशोधन करत आहे. ’एको एटीएम’ असे या कंपनीचे नाव असून नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या (एनएसएफ) मदतीने एक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत मोबाइल युजर्सला आपला जुना मोबाइल एटीएम मशीनच्या स्क्रीन समोर दाखवावा लागेल. त्यानंतर एटीएममध्ये मोबाइलची किंमत दाखविली जाईल. मोबाइल विक्रेत्याला ती मान्य असेल तर तो रोख रुपये घेऊ शकतो अन्यथा मोबाइल न देता परत जाऊ शकतो. मोबाइलची किंमत मान्य असेल तर ग्राहकाला एटीएम मशीनमध्ये मोबाइल सोडून द्यावा लागेल. त्यानंतर जुन्या मोबाइलच्या बदल्यात ग्राहकाला एटीएममधून निश्चित करण्यात आलेली रक्कम तत्काळ मिळेल.

या विशिष्ट एटीएममध्ये आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या माध्यमातून ग्राहकांच्या जुन्या मोबाइलची किंमत ऑनलाइन निर्धारित केली जाते. मोबाइल मॉडेलनुसार जुन्या मोबाइलची किंमत ठरवली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment