प्रीति करणार नाही आता रोमांस

बॉलीवूडमधील आघाडीच्या दुसऱ्या हिरोईनची कल्पना नाही, मात्र लग्नाच्या विषयावर झिलमिल गर्ल प्रीति झिंटा सिरीयस झाली आहे. याबाबतीत प्रीतीने काहीही ठरवले नाही मात्र लग्नाबाबत आता सिरीयसली विचार करणे सुरु केले आहे.

काही दिवसापुर्वीच मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये प्रीति ही स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. यावेळी पत्रकाराशी बोलताना प्रीति म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसापासून मला बरच फटके बसले असल्याने मी कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत आहे. त्यामुळे आगामी काळात रोमांसच्या चक्कर मध्ये पडायाचे नाही, असे ठरवले आहे. त्याऐवजी सरळ लग्न करणार आहे.’

गेल्या काही दिवसापासून नेहमीच या ना त्या कारणाने प्रीति झिंटा चर्चेत असत होती. नेहमीच तिच्या रोमांस व ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. तिचे नाव यापूर्वी मॉडेल मार्क रॉबिनसन, नेस वाडिया आणि विक्रम चटवाल यांच्या सोबत जोडले गेले होते. त्यामुळे आता भविष्य काळात सकारत्मक पॉप्युलारिटी मिळवण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. सध्या ती ‘इश्क इन पॅरीस’ या तिच्या होम प्रोडक्शनच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीजी आहे.