पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारा ’हिरोईन’

मधुर भांडारकरच्या हिरोईन कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या पुऱ्या करण्यात चित्रपट कमी पडतो. केवळ करिना साठी मात्र हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

एखाद्या चित्रपटाचे बजेट काय असणार, हे चित्रपटात दिसणार्‍या फिल्म अवॉर्ड फंक्शनवरुन आपल्या लक्षात येऊ शकत. एकेकाळी सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणारी हेलन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर येते. ’हिरोईन’ या चित्रपटात हेलन शगुफ्ता रिझवीच्या भूमिकेत आहे. शगुफ्ता आपल्या काळातील एक नावाजलेली अभिनेत्री असते. आपल्या भाषणात शगुफ्ता, ज्यांनी तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात मदत केली आहे, त्या सगळ्यांना धन्यवाद देते.

शगुफ्ताचे आता वय झाले असून, ती चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारते. या भूमिकांमधून तिला मिळणार्‍या पैशातून तिचा उदरर्निवाह सुरु आहे. शगुफ्ता खर्‍या अर्थाने या चित्रपटाचा आत्मा आहे.

या शो बिझनेसमध्ये काही कलाकारांच्या संदर्भातील काही भयावह गोष्टी दृष्टीस पडतात. विशेषतः चित्रपटसृष्टीत उदयास येणारे कलाकार प्रसिद्धीच्या नादात वेडे झालेले दिसतात. ही खरचे खूप चिंतेची बाब आहे. हा चित्रपट याविषयाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मला वाटते. हा टिपिकल मधुर भंडारकर स्टाईल सिनेमा आहे.

शगुफ्ता ही व्यक्तीरेखा काही सेकंदांपुरती चित्रपटात दिसते. सेक्स हा चित्रपटाचा मध्यबिंदू आहे. हिरोईनच्या आईचे कॅबिनेट मंत्र्याबरोबर संबंध आहेत. ती आपल्या मुलीची पद्मश्रीसाठी शिफारस करते.

करीना कपूर (सक्षम आणि मुख्य प्रवाहाबरोबर जाणारी) या चित्रपटातील ’हिरोईन’ आहे. माही अरोरा असे या हिरोईनचे नाव आहे. ती बर्‍याच वर्षांपासून चित्रपटांमध्ये अभिनय करते आहे. चित्रपटामध्ये ती उद्धट, घमेंडखोर आणि भावनाशून्य दिसते. ही हिरोईन एका विभक्त कुटुंबाशी संबंधित असल्याबरोबरच मानसिक आजारानेही त्रस्त आहे. मनोवैज्ञानिक तिची कोणतीही मदत करु शकत नाहीत. ती या इंडस्ट्रीत एक नवा खेळ रचायचे ठरवते. आपले डगमगीत करिअर रुळावर आणण्यासाठी हिरोईन एका क्रिकेटरबरोबर डेटिंग करते. असे प्रसंग आपल्याला बॉलिवूडमध्ये सहज पाहायला मिळतात. क्रिकेटर आणि बॉलिवूड स्टार्सचे संबंध जगजाहीर आहेत. क्रिकेटरबरोबरचे तिचे डेटिंग तुम्ही चित्रपटात नक्की एन्जॉय कराल.

हिरोईन हा चित्रपट माही अरोरा या हिरोईनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची माहिती देतो. चित्रपटाच्या सुरुवातीला माहीबद्दल फार थोडचे आपल्याला कळते. बॉलिवूडच्या मेन स्ट्रीम चित्रपटांची एक शैली आहे. झोया अख्तरचा ’लक बाय चान्स’ हा चित्रपट वास्तववादी वाटतो. तर मिलन लुथरियाचा ’द डर्टी पिक्चर’ मनोरंजन करणारा आहे. मधुर भांडारकरचे चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करतात. त्यांच्या चित्रपटांमध्ये श्रीमंती (कार्पोरेट), प्रसिद्धी (फॅशन) किंवा हे दोन्ही मिळून (पेज थ्री) म्हणजे सगळे काही पाहायला मिळते. या चित्रपटांचे बजेट कितीही असो या चित्रपटांमधून प्रेक्षक नक्कीच संतुष्ट होतात.
हा चित्रपट पाहताना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. हिरोईनचे क्रिकेटरबरोबर असेलले डेटिंग युवराज सिंगशी साधर्म्य साधणारे आहे का? करीना कपूरने रवीना टंडनची भूमिका साकारली का? पुढे करिअर ढासळायला लागल्यावर एखाद्या व्यावसायिकाबरोबर आयपीएल टीम विकत घेणार असल्याचे हिरोईन म्हणते. हे दृश्य शिल्पा शेट्टी, प्रीति झिंटाशी साधर्म्य साधणारे वाटते.

केवळ मनोरंजनासाठी थिएटरमध्ये आलेला आणि फार विचार न करणारा पिटातला प्रेक्षक हे सगळे बघून नक्कीच खुश होतो. खरे तर प्रेक्षक कधीही कलाकार किंवा दिग्दर्शकाच्या आयुष्यातील इनसाईड स्टोरी बघत नाही. कलाकारही प्रोफेशनल असतात. ते आपले काम तितक्याच आत्मियतेने करत असतात. मात्र त्यांच्या आयुष्यातील वरवरची झगमगाटच पिटातल्या प्रेक्षकांना आकर्षित करत असते. प्रेक्षक कधी सुजाण होतील, ते कधी गंभीरपणे या माध्यमाकडे बघतील हे माहित नाही. मात्र तो दिवस येईल याची मला खात्री आहे.

केवळ मनोरंजनासाठी चित्रपट बघणार्‍या पिटातल्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. कारण पब्लिसिटीच्या जोरावर चित्रपट विकता येतो, हे दिग्दर्शक निर्मात्याला चांगलेच ठाऊक आहे.

Leave a Comment