निवड समिती अध्यक्षपदी संदीप पाटील

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीच्या अध्यक्ष पदाची माळ संदीप पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आली. के. श्रीकांत यांच्याकडून पाटील पदभार स्वीकारतील.

जुन्या निवड समितीमधील मध्य विभागाचे नरेंद्र हिरवाणी, पूर्व विभागाचे राजा व्यंकट आणि पश्चिम विभागाचे सुरेंद्र भावे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. निवड अमितीत केवळ एक वर्षापूर्वी आलेले मोहिंदर अमरनाथ यांनाही वगळण्यात आले आहे.

नव्या निवड समितीत पूर्व विभागासाठी साबा करीम, दक्षिण विभागातून रॉजर बिन्नी, उत्तर विभागासाठी विक्रमसिंग राठोड तर मध्य विभागासाठी राजेंदरसिंग हंस यांची निवड करण्यात आली.

Leave a Comment