उत्तेजक चाचणीवरून युवीची ‘सटकली’

कोलंबो: खेळाडूंकडून होणारे उत्तेजकांचे सेवन रोखण्यासाठी होणार्या तपासणीवर युवी भडकला आहे. दर तीन दिवसांनी या ‘डोप’ तपासणीची काय आवश्यकता; असा सवाल त्याने केला. प्रत्यक्षात आयसीसीच्या नियमानुसार उत्तेजक प्रतिबंधक यंत्रणा खेळाडूंना केव्हाही आणि कितीही वेळा तपासणीसाठी बोलावू शकते.

मंगळवारी टीम इंडियाचे सरावसत्र सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना तपासणीसाठी बोलाविण्यात आले. झोकात पुनरागमन करणारा हरभजन, वीरेंद्र सेहवाग, आर. अश्विन हे तपासणी करून आले. मात्र ज्यावेळी युवराजला तपासणीसाठी बोलाविण्यात आले तेव्हा युवीची ‘सटकली’. दर तीन दिवसांनी कसली तपासणी करता? किती वेळा तपासणी करणार आहेत; असे सवाल करत त्याने यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला.

मात्र भारतीय संघाचे व्यवस्थापक आर. एन. बाबा यांच्या म्हणण्यानुसार डोप तपासणी ही नियमित प्रक्रिया आहे. कोणत्याही आयसीसी स्पर्धे दरम्यान खेळाडूंना पूर्वकल्पना न देता तपासणीसाठी बोलाविले जाऊ शकते.

Leave a Comment