महेंद्रसिंग धोनीकडून हरभजनचे कौतुक

कोलंबो: भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याच्या खेळाचे तोंड भरून कौतुक केले आहे. तब्बल १४ महिन्यानंतर संघात पुनरागमन करण्यासाठी मिळालेल्या संधीचे भज्जीने सोने करून दाखविल्याचे प्रशंसोद्गार धोनीने काढले.

इंग्लंड बरोबरच्या टी-२० सामन्यातील ऐतिहासिक विजयाचे श्रेय नि:संशय फिरकी गोलंदाजांना असल्याचे नमूद करून धोनी म्हणाला की; पियुष चावलानेही या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र तो याहूनही चांगली गोलंदाजी करू शकला असता; असे मतही धोनीने व्यक्त केले.

हरभजनच्या गोलंदाजीची मात्र कर्णधाराने तारीफ केली. भज्जीने आखूड टप्प्याचे चेंडू न टाकता खोल टप्प्याची गोलंदाजी करून फलंदाजांना फटके खेळण्यास भाग पडण्याचे धाडस दाखविले. त्याने दूसरा आणि टॉप स्पिन बॉल्सचा प्रभावी वापर केल्याचेही धोनीने नमूद केले.

रोहित शर्मा आणि गौतम गंभीर या युवा फलंदाजांच्या कामागिरीबद्दलही धोनीने समाधान व्यक्त केले.

Leave a Comment