काश्मीर टू बर्मिंगहॅम बाय रोड

लंडन: काश्मीरपासून थेट युरोपात बर्मिंगहॅमपर्यंत बस मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने ब्रिटीश सरकारने योजना आखली आहे. त्यासाठी रस्त्याच्या उभारणीच्या दृष्टीने जागेची पाहणीही पार पडली आहे. हा मार्ग तब्बल ४ हजार मैलांचा असून या प्रवासाला १२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बसमार्ग ठरणार आहे.

बर्मिंगहॅम शहरात राहणार्‍या मूळ काश्मिरी लोकांची संख्या जगात सर्वाधिक असल्याने काश्मीरमधील मीरपूर ते बर्मिंगहॅम अशा मार्गाची आखणी करण्यात येत आहे. या प्रवासाला १३० पौंड एवढी रक्कम मोजावी लागेल.

या मार्गावर सर्वात मोठे आव्हान सुरक्षेचे ठरणार आहे. कारण हा मार्ग पाकिस्तानातील क्वेट्टा येथून अफगाणिस्तानातील तालिबानांच्या प्रभाव क्षेत्रातून जाईल. इराणसह अनेक देशातून हा मार्ग जाणार आहे.

Leave a Comment