रणबीरला अजून खूप शिकायचे आहे – ऋषी कपूर

अभिनय रणबीर कपूरच्या रक्तातच आहे. त्याच्या सिनेमांच्या निवडीमुळे, त्यातील त्याच्या अभिनयामुळे आणि उपजत सौंदर्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. कमी काळात रणबीर सुपरस्टारपदाला जाऊन पोहोचला. तरीही त्याच्या वडिलांना ऋषी कपूर यांना रणबीरचा अभिनय परिणामकारक वाटत नाही.

रणबीरचा अभिनय अजूनही परिपक्व नाही, त्यात अनेक त्रुटी आहेत असे मत ऋषी कपूर यांनी नुकतेच एका दैनिकाशी बोलताना मांडले. त्याला एक कलाकार म्हणून अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे, असे सांगून ते  म्हणाले, ’रणबीर कधी लार्जर दॅन लाईफ कॅरक्टर रंगवत नाही. तो एक अभिनेता म्हणून मोठी आव्हाने पेलतो, याबद्दल मला अभिमान वाटतो. पण मला त्याचे सिनेमे आवडत नाहीत, कारण त्यात त्याच्या व्यक्तीचित्रणात अनेक त्रुटी आढळून येतात.’

रणबीर कपूर कडे रुप आणि अभिनय यांचा वंशपरंपरागत चालत आलेला वारसा आहे. पणजोबा पृथ्वीराज कपूर, आजोबा राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर वडिल ऋषी कपूर हे सगळेच जण आपल्या काळातील नामवंत अभिनेते होते. रणबीरनेही वेगळ्या भूमिका साकारत आपल्या ताकदीवर सिनेसृष्टीत स्वतःचे नाणे खणखणीत वाजवले आहे.

Leave a Comment