
मुंबई, दि.२२ – अॅपल कंपनीने आयफोन ५ साठी तयार केलेल्या अॅपल मॅप्स या अॅप्लीकेशनमध्ये माटुंगा स्टेशनची नोंद अरबी समुद्रात झाली आहे. मुंबईची शान असणारा वांद्रे वरळी सागरी सेतू या अॅपमध्ये अस्तित्वातच नाही. सर्वाधिक आधुनिक म्हणून ओळखल्या जाणार्या या अॅपल मॅप्समध्ये मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशनची नोंद झालेली नाही. काही स्टेशन तर मूळ जागेपेक्षा खूप दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे. अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही (आयओएस सहा) अनेक दोष आढळले आहेत.