सिद्धटेकचा सिद्धीविनायक

नगर जिल्ह्यातील सिद्धटेक या भीमेकाठी वसलेल्या छोट्याशा गावांतील हा गणपती अष्टविनायकांतील दुसरा गणपती आहे. हा उजव्या सोंडेचा असून तो अतिशय जागृत आणि कडक आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे असलेल्या डोंगरावरच विष्णूला सिद्धी प्राप्त झाली होती ती गणेशाच्या दर्शनाने. येथे प्रत्यक्ष विष्णूला गणेशाने दर्शन दिले होते व विष्णूनेच हे गणेश मंदिर बांधले असे सांगितले जाते. भीमा मंदिराजवळून वाहते पण ती कितीही जोरात वाहिली तरी पाण्याचा आवाज अजिबात येत नाही हे विशेष. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिरात असलेले गर्भगृह किवा गाभारा पाच फूट उंच आणि १० फूट रूंद आहे. अन्य देवतांची मंदिरेही आवारात असून त्यात शिव, शितळादेवी, विष्णू मंदिरांचा समावेश आहे.
siddhatek-ganpati-temple
गणपतीची स्वयंभू मूर्ती तीन फूट उंचीची असून अडीच फूट रूंद आहे. उत्तराभिमुख असलेली ही मूर्ती एका कोपर्‍यात असून या गणपतीला प्रदक्षिणा घालायची संपूर्ण डोंगरालाच प्रदक्षिणा घालावी लागते. त्याला अर्धा तास लागतो.
siddhatek-ganpati-temple2
इथे अशी हकीकत सांगितली जाते की या मंदिराचा रस्ता पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी बांधला आहे. कांही कारणाने फडके यांचे सेनापतीपद गेले तेव्हा त्यांनी या गणपतीची आराधना करून २१ प्रदक्षिणा घालण्याचा नेम केला. एकविसाव्या दिवशी त्यांना पेशव्यांनी पुन्हा मानाने बोलावले आणि सेनापतीपद दिले. त्यांनी गणपतीला नवस केला होता की सेनापती म्हणून जी पहिली लढाई करेन त्यात जो किल्ला जिंकेन त्याच्या दगडांनी मंदिराचा रस्ता तयार करेन. त्यांनी पहिले युद्ध जिंकले आणि बदामी किल्याचे दगड या रस्त्यासाठी वापरले. मंदिराचा आतला सभामंडप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला आहे.

siddhatek-ganpati-temple1

पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ४८ किमीवर श्रीगोंद्याजवळ हे देवस्थान आहे.

Leave a Comment