लंडन – गॅरेजमध्ये गेल्या साठ वर्षांपासून गंजलेल्या अवस्थेत असलेल्या १९२८ च्या एका मर्सिडीजचा चक्क ३० लाख पौंड (सुमारे २६ कोटी रुपये)त लिलाव झाला. एकेकाळी प्रसिद्ध असलेली असलेली ही एस टाइप मर्सिडीज बेंज १०० किमी प्रति तास वेगाने धावू शकत होती.
गंजक्या मर्सिडीजला २६ कोटींची बोली !
विशेष म्हणजे १९५२ पासून भंगार म्हणून गॅरेजमध्ये उभी असलेली ही कार आजही एकदम चांगल्या स्थितीत आहे. १९२८ मध्ये जेव्हा हे मॉडल लाँच करण्यात आले तेव्हा त्याची गणना सर्वात वेगवान वाहनांत केली जात होती. या कारची बोली लावण्यासाठी मोठ्याप्रमाणावर लोक एकत्र जमले होते.
पहिल्यांदा खरेदी केल्यापासून ही कार एकाच व्यक्तीकडे होती. अर्थात अद्याप खरेदीदाराच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. कारच्या मीटरमध्ये आजही १३, ४७८ किमी नोंद आहे. तिच्या मूळ निळ्या रंगाचे सौंदर्य आजही जैसे थे आहे.
नंबर प्लेटची किंमत नऊ कोटी रुपये
१९०३ मध्ये जारी करण्यात आलेल्या एका नंबर प्लेटला विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. तिची किंमत १० लाख पौंड (सुमारे नऊ कोटी रुपये) ठेवली आहे. ही नंबर प्लेट असाधारण आणि ऐतिहासिक आहे. तिला नॉर्थम्बरलैंड काउंटी काउंसिलने १९०३ मध्ये जारी केले होते.
