विस्तुला नदीपात्रात सापडली ऐतिहासिक शिल्प

लंडन: सुमारे ४०० वर्षापूर्वी स्वीडिश आक्रमक लुटून नेण्याच्या प्रयत्नात असलेला बहुमोल शिल्प खजिना विस्तुला नदीच्या पात्रात आढळून आला आहे. या खजिन्यात १० हजाराहून अधिक संगमरवरी मूर्ती आणि नाजूक कोरीव काम असलेल्या खांबांचा समावेश आहे.

स्वीडन आक्रमकांनी पोलंडवर स्वारी करून ही बहुमोल शिल्प लुटून आपल्या देशात नेण्याचा प्रयत्न सन १६५५ साली केला. मात्र या शिल्पांच्या वजनामुळे ती आक्रमकांना आपल्या जहाजातून काढून टाकावी लागली असावी किंवा भारी वजनामुळे त्यांच्या जहाजाला जलसमाधी मिळाली असावी; असा तज्ज्ञांचा कयास आहे.

हा बहुमोल खजिना पाण्याअभावी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे उघडकीला आला आहे. या ठिकाणी दुसर्‍या जागतिक महायुद्धातील तोफगोळे आणि यहुदी थडगीही आढळून आली आहेत.

स्वीडन आक्रमणाचा काळ हा पोलंडच्या इतिहासात ‘द डेल्युज’ म्हणून ओळखला जातो. या आक्रमणानंतर व्हर्सायची रयाच नष्ट झाली.

Leave a Comment