मारूती अल्टो ८०० सीएनजी मॉडेल येणार

नवी दिल्ली दि.१९- पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ पाहता देशातील एकूण कार विक्री कमी होत आहे. मात्र नवनवीन मॉडेल्स बाजारात येतच आहेत. कार उत्पादकांना स्पर्धेत टिकण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणे भाग पडत असून देशातील सर्वात मोठी कार कंपनी असा नावलौकीक असलेल्या मारूती सुझुकी लिमिटेड त्यांची नवी अल्टो ८०० सीएनजी मॉडेल बाजारात आणतील अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ञ वर्तवित आहेत.

अल्टो ८०० ची लाँच डेट जवळ येत चालली आहे त्यामुळे या गाडीविषयी अनेक तर्कविर्तक आणि अंदाजही वर्तविले जाऊ लागले आहेत. पिपल्स कार अशी त्याची जाहिरात केल्याने लोकांच्या या गाडीकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. टाटाची नॅनो आणि ह्युंडाईची इऑन या गाड्यांशी अल्टोला स्पर्धा करावयाची आहे. त्यामुळे विक्री वाढविण्यासाठी सीएनजी मॉडेल ही गरज बनली आहे. गत वर्षी जुलैत कंपनीने २४ हजार गाड्या विकल्या होत्या तो आकडा या जुलैत १७५०० वर घसरला आहे. एप्रिल २०१२ मध्ये तर अल्टोवर मात करून स्वीफ्टने विक्रीचा उच्चांक केला होता. अल्टो ८०० सीएनजी मॉडेलसाठी ग्राहकाला २५ हजार रूपये जादा मोजावे लागतील असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment