भारताप्रमाणे श्रीलंकेतील मैदान सुद्धा फिरकी गोलंदाजीला मदत करतात. मात्र या ठिकाणी झालेल्या सराव सामन्यात मात्र चित्र काहीसे वेगळे दिसते आहे. आतापर्यंतच्या सामन्यात जलदगती गोलंदाजाने कमाल दाखवली आहे.

भारताप्रमाणे श्रीलंकेतील मैदान सुद्धा फिरकी गोलंदाजीला मदत करतात. मात्र या ठिकाणी झालेल्या सराव सामन्यात मात्र चित्र काहीसे वेगळे दिसते आहे. आतापर्यंतच्या सामन्यात जलदगती गोलंदाजाने कमाल दाखवली आहे.
१३ ते १७ सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघादरम्यान सराव सामने झाले. या सर्व सामन्यात जलदगती गोलंदाजाने ७५ तर फिरकी गोलंदाजाने ३५ विकेट घेतल्या आहेत. भारतासोबतच सर्व टीमने वेगवान गोलंदाजावर विश्वास ठेवला आहे. श्रीलंकेविरुद्च्या सामन्यात बालाजीने तीन तर इरफान पठाणने पाच बळी घेतले. तर फिरकी गोलंदाज आर अश्विनने चार विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने चार बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने लेग स्पिनर ब्रोड होगवर विश्वास दाखवीत उर्वरित चार जलदगती गोलंदाजाना संधी दिली आहे. श्रीलंकेने संघात चार जलदगती गोलंदाजाना घेतले आहे. पाकने तीन फिरकी गोलदाजासोबत तीन जलदगती गोलंदाजाना संधी दिली आहे. वेस्टइंडीज, इंग्लंड व न्यूझीलंडने देखील जलदगती गोलंदाजावरच अधिक विश्वास दाखवला आहे.
ट्वेंटी-२० च्या विश्वचषकाचा माहोल आजपासून (१८ सप्टेंबर रोजी ) श्रीलंकेतील मैदानावर रंगणार आहे. हा विश्वचषक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.