आर्क्टिक महासागरातील बर्फ ४ वर्षात वितळण्याची भीती

लंडन: जागतिक तापमान वाढीचा वेग कायम राहिल्यास केवळ ४ वर्षाच्या कालावधीत आर्क्टिक महासागरातील बर्फ संपूर्ण वितळून जगावर मोठी आपत्ती कोसळेल; असा इशारा केम्ब्रिज विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रा. पीटर वेहम यांनी दिला आहे.

प्रा. वेहम हे दीर्घ काळापासून उत्तर धृवावरील बर्फ जमण्याचा आणि वितळण्याचा अभ्यास करीत आहेत. इतर वर्षांच्या तुलनेत यावर्षी बर्फ जमण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिक समुद्रात उन्हाळ्यात बर्फ वितळण्याचा वेग वाढला आहे; तर थंडीत बर्फ जमण्याचे प्रमाण सातत्याने घटत आहे; असे प्रा. वेहम यांनी आपल्या अहवालात नमूद केले. हीच परिस्थिती कायम राहिली तर सन २०१५-१६ च्या ओगस्ट- सप्टेंबर महिन्यात आर्क्टिक प्रदेशात बर्फाचे नामोनिशान राहणार नाही; अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सन २०११ मध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान ७ अंश सेल्सिअस पर्यंत वाढले असून त्यामुळे बर्फ वितळण्याचा वेग वाढत असून वातावरणात मिथेनचे प्रमाणही वाढत आहे. मिथेन हा एक ग्रीन हाऊस वायू असून त्याच्यामुळे तापमान वाढीचा वेग वाढत असल्याचेही प्रा. वेहम यांनी नमूद केले.

Leave a Comment