मुंबई: मुंबईवरील २६/११ च्या खटल्यात फाशीची शिक्षा झालेला पाक दहशतवादी अजमल कसाब याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज रवाना केला आहे. आर्थर रोड कारागृह अधीक्षकांमार्फत हा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला.
मुंबई: मुंबईवरील २६/११ च्या खटल्यात फाशीची शिक्षा झालेला पाक दहशतवादी अजमल कसाब याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज रवाना केला आहे. आर्थर रोड कारागृह अधीक्षकांमार्फत हा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला.
कसबला मुंबईच्या दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयाने सन २०१० साली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयानेही ती कायम केली. सर्वोच्च न्यायालयाने देखील कसबचा गुन्हा माफीला पात्र नसल्याची टिपण्णी करून फाशीच्या शिक्षेवर २९ ओगस्ट २०१२ रोजी शिक्कामोर्तब केले.
कसबाने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज आल्यास तो अल्पावधीत निकाली काढला जाईल; असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.