सुनीताने घेतली अंतरीक्ष स्थानकाची सूत्रे

ह्युस्टन: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कमांडर गीनेडी पडल्का यांच्याकडून आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष स्थानकाची सूत्रे आपल्या हातात घेतली. अंतरीक्ष स्थानकाची सूत्रे घेणार्‍या त्या दुसर्‍या महिला आहेत.

आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष स्थानकावरून एक्सपिडीशन ३२ चे ३ सदस्य रशियन बनावटीच्या कॅप्सूल सुयोजद्वारे पृथ्वीकडे निघाले आणि सोमवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कझाकिस्तान येथे पोहोचले. कमांडर पडल्का, जो अकाबा आणि सरगी रेवीन हे तिघे १२३ दिवस अंतराळात होते.

आता आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष स्थानकावर सुनीता यांच्यासह जपानचे अकिहितो होशिडे आणि रशियाचे युरी मालेनचेन्को उपस्थित आहेत. हे तिघे आक्टोबरच्या मध्यापर्यंत अंतराळात राहणार आहेत.