येत्या काही दिवसात कलर्स वाहिनीवर बहुचर्चित असलेला बिग बॉसचा सीझन सहा सुरु होणार आहे. या मधील सहभागी होणाऱ्या प्रतिस्पर्धी निवडताना त्यामध्ये इंटरफेर करणार नसल्याचे बिग बॉसचा होस्ट असलेल्या सलमान खानने प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसापासून सलमान खान ‘बिग बॉस’ मधील प्रतिस्पर्धी निवडताना पार्सलिटी करीत असल्याचा आरोप काही जनाकडून केला जात आहे. त्यामुळेच सलमान खानने या स्पर्धेत इंटरफेर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सलमान म्हणाला, ‘आतापर्यंत या स्पर्धेत मी कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळेच मी ‘बिग बॉस’मधील निवड प्रक्रियेत शेवटपर्यंत सहभागी होणार नाही. गेल्या वेळेस काही जणांकडून माझ्यावर बिनबुडाचा आरोप लावण्यात आल्याने मी थोडसा नाराज झालो आहे. त्यामुळे मी निवड प्रकियेत सहभागी न होण्याचे ठरविले आहे.’
‘बिग बॉस’चा सीझन सहावा सीझन ६ ऑक्टोबर पासून सुरु होणार असून या शोचा सलमान तिसऱ्यांदा होस्ट म्हणून काम करत आहे.