टंचाईच्या संकटावर मात करू: मुख्यमंत्री

औरंगाबाद: मराठवाड्यात टंचाईचे संकट कायम असले तरीही तात्कालिक आणि दीर्घकालीन उपापयोजना अंमलात आणून या संकटाचा कसून मुकाबला केला जाईल; अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित शासकीय समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांबाबत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सप्टेंबरच्या सुरुवातीला थोडा पाऊस झाला असला तरीही मराठवाड्याला टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, नद्यांवरील बांध, पाझर तलाव, विहिरी आणि जलस्त्रोतांचे पुनर्भरण अशा उपाययोजना केल्या जात असून तत्कालीन उपाययोजना करण्यासाठी मंडलस्तरावर नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment