बॉक्स ऑफिसवरही बर्फी गोडच, २ दिवसात २० कोटींची कमाई

मुंबई, दि.१६ – अनुराग बासूच्या ’बर्फी’ने दोन दिवसातच २० कोटींची कमाई केली आहे. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली ’बर्फी’ बॉक्स ऑफिसवर गोड ठरली आहे. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला, त्या दिवसाची कमाई ९.२० कोटी रुपये होती. शनिवारी यात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली. रविवारीही हा चित्रपट प्रेक्षक खेचण्यात यशस्वी झाला मात्र त्याची कमाई अद्याप कळू शकली नाही.

रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तर त्याच्या सोबतीला प्रियंका चोप्रा थोडी अडखळत बोलणार्‍या मुलीच्या भूमिकेत आहे. इलिना डिसूझाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. तिची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे.

Leave a Comment