मराठीतली एकमेव हॉट बेब सई ताम्हणकरने ‘नो एंट्रि- पुढे धोका आहे सिनेमात बिकनी सीन दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण सई आता त्याच्याही पुढे गेली असल्याचे समजते. ‘पुणे ५२’ या चित्रपटात अभिनेता गिरीश कुलकर्णीसोबत तिने एक हॉट बेड सीन दिल्याची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात उमटू लागली आहे. किमान आतातरी या चित्रपटानंतर मराठी सिनेमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ‘बोल्ड’ होईल असे म्हणायला हरकत नसावी.
मराठी सिनेमा अधिकाधिक बोल्ड आणि तरुणाईला भुरळ पाडणारा व्हावा यासाठी केवळ चर्चांचे फड न रंगवता ते कृतीत आणण्यासाठी काही दिग्दर्शकांनी कंबर कसली आहे. ‘पुणे ५२’ हा ‘सेक्सी थ्रिलरपट’ याच पठडीतला मानावा लागेल. मराठी नट्या बिकिनीला ‘नो एंट्री’ म्हणत असताना सई ताम्हणकरच्या बिनधास्त अॅटिट्यूडमुळे बिकिनी शॉट चांगलाच गाजला.
आता सईने थेट हॉट ‘बेड आणि किसिंग सीन’ वर झेप घेतली आहे. यासंदर्भात अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी बोलण्यास नकार दिला, तर या चित्रपटाला ‘सेक्सी थ्रिलर’पट असे बिरुद लावले तरीही त्यात काहीही ‘अॅडल्ट’ नसल्याचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सांगितले. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.