टोकियो सर्वात महाग तर दिल्ली, मुंबई स्वस्त शहरे

जिनेव्हा दि.१६-स्वीस बँकेच्या यूबीएसने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार खाण्यापिण्याच्या बाबत जगात सर्वाधिक महाग शहर जपानची राजधानी टोकियो असून त्याखालोखाल झुरिच आणि जिनेव्हा या शहरांचा नंबर आहे. विशेष म्हणजे भारतात महागाईने पोळत असलेल्या नागरिकांच्या भावना कांहीही असल्या तरी खाण्यापिण्याच्या बाबत सर्वात स्वस्त शहरे आहेत मुंबई आणि दिल्ली. स्वीस बँकेने ५८ देशांतील ७२ शहरांचे सर्वेक्षण यासाठी केले आहे.

 विविध देशातील ३९ पारंपारिक पदार्थांची फूड बास्केट यासाठी विचारात घेतली गेली. त्यानुसार दररोजच्या खाण्यात वापरल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांच्या या बास्केटची टोकियोतील सरासरी किमत आहे ९२८ डॉलर्स तर जिनेव्हा आणि झुरिचमध्ये याच बास्केटसाठी मोजावे लागतात अनुक्रमे ७१५ आणि ७०४ डॉलर्स. याच बास्केटची जागतिक सरासरी किमत येते ४२४ डॉलर्स. मात्र मुंबई आणि दिल्लीत याच बास्केटसाठीचा खर्च आहे अनुक्रमे १८६ व २०८ डॉलर्स. टोकियो केवळ खाण्यापिण्याच्या बाबतीतच नाही तर अन्य सेवांतही महागच असून येथेही स्वस्तता आहे ती मुंबई आणि दिल्लीत असेही हा अहवाल सांगतो.

Leave a Comment