कायदा धाब्यावर बसवून पंतप्रधानांचे शुभमंगल

हरारे,दि, १६ – कोर्टाच्या मनाईनंतरही झिम्बाब्वेचे पंतप्रधान मॉर्गन श्वागराई (६०) यांनी आपली प्रेयसी एलिझाबेथ मशेकाशी लग्न केले. ३५ वर्षीय एलिझाबेथ राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांच्या पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची मुलगी आहे. एका कार्यक्रमात त्यांनी एकमेकांना अंगठी घालून लग्नाची औपचारिकता पूर्ण केली. मात्र अद्यापही त्यांनी विवाह रजिस्टरमध्ये हस्ताक्षर करून कायदेशीर पूर्तता केलेली नाही. राष्ट्रपती मुगाबे लग्न सोहळयास उपस्थित नव्हते. मार्च २००९ मध्ये मॉर्गन यांची ३१ वर्षीय पत्नी सुसान एका कार अपघातात मरण पावली होती. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

मॉगर्न यांची माजी प्रेयसी लोकार्डिया करिमासेंगा टेंबोने पंतप्रधानांची पत्नी असल्याचा दावा केला होता. मॉगर्न आणि एलिझाबेथ यांच्या लग्नाला विरोध करताना कोर्टात याचिका दाखल केली होती. टेंबोने यासाठी कोर्टात एक व्हिडिओ सादर केला होता. ज्यामध्ये मॉगर्न यांचे प्रतिनिधी किंमत देताना दाखवले आहे. झिम्बाब्वेमध्ये लग्नावेळी पतीला पत्नीची किंमत चुकवावी लागते. त्यामुळे कोर्टाने लोकार्डिया यांच्या बाजूने निकाल देत मॉगर्न यांच्या लग्नाला मनाई केली होती.

Leave a Comment