
सातारा, दि. १६ – मी केवळ गंमत करण्याचा प्रयत्न केला. पण तो माझ्या अंगलट आला अशी सारवारव केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदें यांनी आज कराडमध्ये केली. बोफोर्स विसरले तसेच लोक कोळसा घोटाळाही विसरतील असे विधान सुशीलकुमार शिंदेंनी काल पुण्यात केले होते. त्यांच्या या विधानावरुन काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. विरोधकांनीही शिंदेंवर कडाडून टीका केली.