न्यूयॉर्क: हेरी पॉटरमधील हरमायनी अर्थात हॉलीवूडची विख्यात अभिनेत्री एमा वॉटसन ही आता इंटरनेट विश्वात दहशतीचे कारण ठरली आहे. तिचे नाव जरी कोणी सर्च केले; तरी त्याच्या संगणकात व्हायरस आणि धोकादायक सोफ्टवेअर्सचा शिरकाव होऊन संगणक कामातून जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अँटीव्हायरस बनविणारी कंपनी मेकेफीने हा दावा केला आहे.
हॅरी पॉटरमुळे अमाप लोकप्रियता मिळालेल्या एमाचे ऑनलाईन चाहतेही लाखो आहेत. सायबर गुन्हेगारांनी तिच्या या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन कारस्थाने करण्यास सुरुवात केली आहे. तिचे नाव सर्च करणार्याच्या संगणकात शिरून संगणकाचे नुकसान करण्याबरोबरच वैयक्तिक माहितीची चोरी केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
मागील वर्षी अभिनेत्री हायडी क्लादम हिच्याबाबतीत असाच प्रकार झाला होता. याशिवाय जेसिका बेल, इव्हा मेंडेस, सेलेन गोमेझ, हेली बेरी यांच्याही नावाचा सायबर गुन्हेगारांनी गैरवापर करून व्हायरस पसरविला आहे.