अलटांटिक महासागरात नील आर्मस्ट्रॉंगना चिरनिद्रा

वॉशिग्टन दि.१५ – चंद्रावर उतरलेला पहिला मानव नील आर्मस्टाँग याला शुक्रवारी अटलांटिक महासागरात चिरनिद्रा देण्यात आली. लष्करी इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. गुरूवारी त्यांच्या श्रद्धांजली सभेला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

नासाने चंद्रावर सोडलेल्या अपोलो ११ अंतराळयानाचे कप्तान असलेल्या नील यांनी चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवून २० जुलै १९६९ ला इतिहास रचला होता. ५ ऑगस्ट ३० रोजी जन्मलेल्या नील यांनी प्रथम लष्करात सेवा बजावली होती आणि कोरियन युद्धात सहभागही घेतला होता. त्यानंतर नासाचे प्लेन पायलट म्हणून ते रूजू झाले होते व नंतर अंतराळयानाचे कप्तान म्हणून त्यांनी काम केले. त्यातूनच चंद्रमोहिमेत सहभागी होऊन त्यांनी चंद्रावर मानवी पाऊले उमटविली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ होते.

Leave a Comment