मुंबई: देशातील व्यवहारांमध्ये रोखीने होणार्या व्यवहारांमुळे मोठ्या समस्या निर्माण होत असून भ्रष्टाचारामुळे त्यात आणखी भर पडत आहे; असे मत रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी व्यक्त केले. व्यवहारातील रोकड कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व बँक प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
व्यवहारातील रोख रकमेच्या वापराला आळा घातला गेल्यास भ्रष्टाचार नियंत्रणात येईल. पतधोरणाच्या प्रश्नांना उत्तरे शोधणे आणि बँकांच्या रोख रक्कम व्यवस्थापनाची प्रक्रिया सुलभ होणे यासाठी मदत होईल; असेही खान यांनी सांगितले.
जगात सर्वाधिक रोख रक्कम उपलब्ध असलेल्या मोजक्या देशात भारताचा समावेश असून जपान सारख्या प्रगत देशातही मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार होतात; असे सांगून शेख म्हणाले की; सरकारने २५ हजार रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्स्फरद्वारे करण्याचे बंधन घातले आहे. मोबाईल आणि ऑनलाईन बेन्किंग, कोअर बेन्किंग याद्वारे रोख व्यवहारांवर नियंत्रण आणता येईल; असेही खान म्हणाले.