गडकरी यांची दिग्विजय सिंग यांना नोटीस

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि कोळसाकांडात आरोप झालेले खासदार अजय संचेती यांच्यात व्यावसायिक भागीदारी असल्याचा आरोप करणारे काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांना गडकरी यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. तीन दिवसाच्या आत आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी न मागितल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही या नोटीशीत देण्यात आला आहे.

छत्तीसगड येथे भाजपचे राज्यसभेतील खासदार संचेती यांना मिळालेल्या कोळसा खाणीच्या संदर्भात दिग्विजय सिंग यांनी गडकरी यांना लक्ष्य केले. संचेती आणि गडकरी यांची व्यावसायिक भागीदारी असल्याने कोळसा खाण वाटपातून संचेती यांना मिळालेल्या फायद्यातील हिस्सा गडकरी यांनाही मिळाल्याचा आरोप सिंग यांनी केला होता.

या आरोपाबद्दल गडकरी यांनी त्यांच्या वकील पिंकी आनंद यांच्यामार्फत नोटीस पाठविली आहे.

Leave a Comment