अमृता प्रीतम यांच्या पुत्राची हत्या

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांचे पुत्र आणि चित्रपट क्षेत्रातील गुंतवणूकदार कावत्रा यांची बोरीवली येथे त्यांच्या राहत्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिघे संशयित हल्लेखोर पळून जाण्यात सफल झाले.

कावत्रा हे बोरिवलीच्या एलआयसी कॉलनीत एकटेच राहत असत. ते स्वत: लेखक होते. त्यांची डीजोल्विंग व्ह्यूज फिल्म्स कंपनी असून त्यामार्फत ते चित्रपट निर्मितीसाठी वित्त पुरवठा करीत असत. त्यांची पत्नी दिल्लीला तर मुलगी परदेशात असते. शुक्रवारी दुपारी ११ वाजता त्यांच्या घरातून तिघे जण घाई घाईने बाहेर पडताना इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने पाहिले आणि दुपारी बारा वाजता कावत्रा घरात मृतावस्थेत आढळले.

पोलिसांनी त्यांचे घर सील केले असून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविला आहे.

Leave a Comment