टीम इंडिया घालणार लकी जर्सी

वनडे क्रिकेटमधील विश्वजेता असलेली टीम इंडिया ट्वेंटी-२० ची विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी दोनच दिवसापूर्वी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मात्र अंधविश्‍वासवर विश्वास ठेवणाऱ्या बीसीसीआयने या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने नवीन जर्सी न घालता २०११ साली विश्वचषक जिंकताना घातलेली जर्सी घालवी असे निर्देश दिले आहेत.

याबाबत बोलताना बीसीसीआयचे सीईओ रत्नाकर शेट्टी म्हणाले की, ‘टीम इंडियाने २०११ साली विश्वचषक जिंकताना जी जर्सी घातली होती ती संघासाठी लकी आहे. त्यामुळे टीम इंडियाने आगामी ट्वेंटी-२० च्या विश्वचषकासाठी नवीन तयार केलेली जर्सी न घालता हीच लकी जर्सी घालावी. ज्यामुळे टीम इंडिया हा विश्वचषक जिंकेल असा सर्वाना विश्वास वाटतो. त्यामुळेच अशास्वरूपाचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.’

गेल्या महिन्यातच श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठीच्या टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण सर्व खेळाडूच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र अचानक बीसीसीआयने हा निर्णय बदलत या स्पर्धेस केवळ चार दिवसाचा आवधी असताना आपला निर्णय बदलुन सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.

Leave a Comment