आयपीएलमध्ये एकीकडे शाहरुख खानच्या मालकीची कोलकत्ता नाईट रायडर ही टीम नंबर वन झालेली असताना टायगर सलमान खानने मात्र स्वताला या खेळापासून दूर ठेवनेच पसंत केले आहे. गेल्या काही दिवसापासून लिलाव करण्यात येत असललेल्या डेक्कन चार्जर्स संघ सलमान खान विकत घेणार आहे अशी चर्चा होती. मात्र सलमानने आयपीएलमध्ये इंटरेस्ट नसल्याचे सांगून टाकले आहे.
टायगरला नाही आयपीएलमध्ये इंटरेस्ट
आयपीएलमध्ये यापूर्वीच शाहरुख खान सोबतच प्रीति झिंटा व शिल्पा शेट्टी या अभिनेत्री सुद्धा संघाच्या मालकीण आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आयपीएलमध्ये सहभागी होऊन टायगर सलमान देखील आपले नशीब अजमावणार अशी चर्चा जोरात रंगली होती. हैदराबादचा आयपीएल संघ असलेला डेक्कन चार्जर्स संघाचा दिवाळखोरीमुळे लिलाव केला जाता आहे. हा संघ सलमान खान विकत घेणार अशी चर्चा होती.
याबाबत बोलताना सलमान म्हणाला, ‘ मला जरी क्रिकेट हा खेळ आवडत असला तरी, मी आयपीएलमधील संघ खरेदी करण्यास इंटरेस्टेड नाही. मला प्रेक्षक सिनेमातून पसंद करत असल्याने आगामी काळात त्याच्यावरच लक्ष केंद्रित करणार आहे.’