पर्यावरणशास्त्रातील करिअर

enviro

सध्या तरुणपिढीच्या मनात पर्यावरणा विषयी जागृती निर्माण झालेली आहे. आपण आताच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही हालचाल केली नाही तर आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल, हे या पिढीच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे सरकारनेही पर्यावरणाच्या अभ्यासक्रमाला महत्व दिले असून सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याची जिज्ञासा वाढीस लागलेली आहे. इकॉलाॅजी अॅन्ड एन्व्हायरनमेंट या विषयाचे पदविकेपासून पदव्युत्तर पदवीपर्यंत अभ्यासक्रम देशातल्या विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांतून उपलब्धही झालेले आहेत. काही मुक्त विद्यापीठांनी सुरू केलेल्या अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण या क्षेत्रात उपलब्ध होणार्‍या अमाप संधी विद्यार्थ्यांना दिसत आहे.

या विषयाचा पदवी अभ्यासक्रम म्हणजे बी.एस्सी.चा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेतला जात असतो. या अभ्यासक्रमात इकॉलाॅजी, एन्व्हायरनमेंट, झुऑलाॅजी आणि बॉटनी हे विषय शिकवले जातात. एकदा ही पदवी प्राप्त केली की, केवळ इकॉलाॅजी आणि एन्व्हायरनमेंट या विषयांना वाहिलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. बी.एस्सी.ची ही पदवी घेणारा विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमात वाईल्ड लाईफ म्हणजे वन्य जीवांचा अभ्यास करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बी.एस्सी.ला प्रवेश घेताना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. कर्नाटकातल्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलाॅजिकल युनिव्हर्सिटीमध्ये आणि तिच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये या प्रवेश परीक्षेनंतर पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.

पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आय.आय.टी. ला सुद्धा जाता येते आणि तिथे बी.टेक. (इकॉलाॅजी अॅन्ड एन्व्हायरनमेंट) अशी पदवी उपलब्ध असते. एकदा या विषयात बी.टेक. किवा एम.एस्सी. पदवी घेतली की, पुढे संशोधनही करता येते किंवा राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये नोकरी मिळवता येते. नोकरी आणि प्रगत संशोधन करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी खालील संस्थांशी संपर्क साधल्यास त्यांना या क्षेत्रातल्या प्रगत संधींची कल्पना येऊ शकते. या संस्था पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत आहेत आणि त्यांनी या शास्त्रातल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी तसेच प्रगत शिक्षणासाठी सोयी, सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र या सुविधांचा लाभ करून घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना आपला संशोधनाचा विषय आणि प्रकल्प यांचा विचार करून कोणत्या संस्थेशी संपर्क साधायचा हे ठरवावे लागेल. त्या संस्था खालीलप्रमाणे आहेत.

   अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलाॅजी अॅन्ड एन्व्हायरनमेंट (एटीआरइइ) (www.altree.org)
    रॉयल एन्क्लेव्ह श्रीरामपुरा, जक्कूर पोस्ट, बंगळूर-५६००६४ फोन नं. २३६३५५५५ ईमेल – ([email protected])
    इक्विटेबल टूरिझन ऑप्शन्स् (इक्वेशन्स) (www.equitabletourism.org) फ्लॅट नं. ए-२, फर्स्ट फ्लोअर, नं. २१/७, सेकंड क्रॉस, फर्स्ट ए मेन रोड, आत्मानंद कॉलनी, सुलतानपालिया, बंगळूर ५६००३२ फोन नं. २३६५९७११ ईमेल ([email protected])
    एशियन नेचर कॉन्झर्व्हेशन फौंडेशन, (एएनसीएफ) (www.asiannature.org) एशियन नेचर इनोव्हेशन सेंटर, फर्स्ट फ्लोअर, आयआयएससी, बंगळूर ५६००१२ फोन २३३१५४९० ईमेल ([email protected])
    या यादीत शेवटी उल्लेख केलेली एएनसीएफ ही संस्था बंगळूर येथे हत्तींच्या बाबतीत संशोधन करण्यास वाहिलेली आहे आणि आशिया खंडातील हत्ती, त्यांच्या जाती, त्यांचे जतन आणि पैदास या विषयावर या संस्थेत सखोल अभ्यास आणि संशोधन केले जात असते.

Leave a Comment