अमेरिकन नौदल लीबियाकडे रवाना

वोशिंग्टन: लिबियातील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यात एका कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर अमेरिकन नौदलाचे पथक लिबियाच्या दिशेने रवाना झाले आहे. या पथकात क्षेपणास्त्र तैनात असलेल्या लढाऊ जहाजांचा समावेश आहे.

लिबियामध्ये बेंगाजी येथे असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर सशस्त्र जमावाद्वारे शनिवारी हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात एका वाणिज्य अधिकार्‍याचा मृत्यू झाला. त्यानंतर; आमच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना संरक्षण देणे हे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगत अमेरिकेने महाकाय लढाऊ जहाजांचे पथक लीबियाकडे रवाना केले आहे. त्रिपोली येथील अमेरिकेच्या राजनैतिक दूतावासाचे संरक्षण करण्याची जबाबदारीही या पथकावर सोपविण्यात आली आहे.

या पथकात यूएसएस तोमहोक क्षेपणास्त्र तैनात असलेल्या यूएसएस लबून आणि यूएसएस मेकफॉल या बलाढ्य युद्धनौकांचा समावेश आहे.

Leave a Comment