युवराजवरील दबाव हटला-धोनी

कॅन्सरसारख्या गंभीर आजरावर मात करून युवराज सिंहने न्यूझीलंडसोबतची जी खेळी केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्यावरील दबाव हटण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

मंगळवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यात भारतीय संघाला एका धावेने पराभव पत्कारावा लागला आहे. तरी या सामन्यात युवराज सिंगने कमबॅक करताना मात्र आक्रमक खेळी खेळताना ३४ धावाची खेळी केली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

या सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘ दहा महिन्याच्या विश्रांतीनंतर पाहिल्यादा युवराज खेळात असल्याने त्याच्यावर थोडा फार दबाव होता. मात्र अशा दबावाच्यावेळी त्याने विश्वासपूर्वक फलंदाजी केली आहे. आता त्याचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात तो त्याला हवी तशी कामगिरी करेल. फलंदाजी शिवाय युवराजने चांगली गोलंदाजी करताना सामना संतुलन करण्याचा प्रयत्न केला. हा सामना युवराजच्या दृष्टीने महत्वाचा होता. सर्वाच्या नजरा त्याच्यावर होत्या. त्याने चांगली कामगिरी करीत सर्वाचे मने जिंकली आहेत.’

Leave a Comment