जपान होणार अणुउर्जा मुक्त

टोकिओ: जपानने ऊर्जाविषयक नवीन धोरणाची आखणी केली असून या धोरणानुसार अणुऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यात येणार आहे. अणुउर्जेचा वापर सन २०३० पर्यंत संपूर्ण थांबविण्याचे जपानचे नियोजन आहे.

सुनामीच्या तडाख्यात फुकुशिमाच्या अणुभट्टीत अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग झाला होता. या दुर्घटनेनंतर जपानने अणुऊर्जेच्या वापराबाबत पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी जपानने एक व्यापक धोरण निश्चित केले आहे. त्याचा कृती आराखडा ठरविण्याचे काम सुरू असून या आठवड्यात होणार्‍या पर्यावरण आणि उर्जा या विषयावरील बैठकीत या धोरणाला अंतिम स्वरूप दिले जाईल.

यापूर्वीच जर्मनीनेही सन २०२२ पर्यंत अणु उर्जामुक्तीचे धोरण स्वीकारले आहे.

Leave a Comment