कोळसाकांडप्रकरणी भाजपची राष्ट्रपतींकडे तक्रार

नवी दिल्ली: पंतप्रधान आणि अन्य जबाबदार मंत्र्यांनी कॅग सारख्या घटनात्मक संस्थेवर टीकेची झोड उठवून त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेणे उचित नसल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी कॅगच्या अहवालाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली.

कॅग ही घटनात्मक संस्था आहे. कॅगचा अहवाल लोकलेखा समितीसमोर येण्यापूर्वीच पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांनी कॅग बद्दल अविश्वास व्यक्त केला आणि मतभेदाची बीजे रोवली; अशी तक्रार शिष्टमंडळाने केली.

Leave a Comment