‘एक था टायगर’च्या निर्माता, दिग्दर्शकांवर गुन्हा

मुंबई: ‘एक था टायगर’ हा बॉक्स ऑफिसवर धो धो चाललेला चित्रपट वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. न्यायालयाच्या आदेशाने या चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यावर पटकथा चोरीबद्दल कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

यशराज फिल्म्सच्या ‘एक था टायगर’ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटीपेक्षा अधिक गल्ला जमवून धमाल उडविली आहे. मात्र या चित्रपटाची पटकथा आपण सन २०११ मध्ये यशराजच्या कार्यालयात दिली होती. ती ५० दिवसानंतर आपल्याला परत करण्यात आली. प्रत्यक्षात चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर पटकथा लेखक म्हणून इतरांचे नाव असल्याचे निदर्शनास आले; असा आक्षेप घेऊन आनंद पांडा यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीदरम्यान पांडे यांची बाजू उचलून धरंत पोलिसांना कॉपीराईट भंगाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक कबीर खान, लेखक संयुक्ता आणि निलेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment