संजय-विवेकाच्या मैत्रीमुळे सलमान नाराज

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या वाढदिवसानिम्मित आयोजित पार्टीमध्ये संजय दत्त व विवेक ओबेरॉय यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते सर्वाना कळले. बिजनेस मनेजर धरम ओबेरॉय सोबतचे संबध ताणले गेल्यानंतर संजयने विवेक ओबेरॉय याच्याशी मात्र सध्या जुळून घेतले आहे. मात्र या दोघातील वाढते मैत्रीपूर्ण संबध पाहून टायगर सलमान खान मात्र सध्या कमालीचा नाराज असल्याचे समजते.

शिल्पा व राजसोबत सलमानचे चांगले संबध आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीचे सलमानला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या पार्टीत संजय दत्त व विवेक ओबेरॉयने लवकरच हजेरी लाव्लायचे समजल्याने सलमानने मात्र या पार्टीमध्ये सहभागी होण्याचे टाळले. या पार्टीत सलमान गेला नसला तरी अरबाज व मलाइका या पार्टीत सहभागी झाले होते.

पार्टीप्रसंगी शिल्पा शेट्टी व संजय दत्ताची पत्नी मान्यता हिने प्रेग्नंट असलेल्या विवेकच्या पत्नीला काही टिप्स दिल्या. या पार्टीत विवेक व संजय रात्री उशिरापर्यंत एकत्र गप्पा मारत बसले होते. याची कानोकान खबर सलमानला लागल्याने तो गेल्या काही दिवसापासून संजय दत्तवर काहीसा नाराज असल्याचे समजते.