पुन्हा उभे राहतेय वर्ल्ड ट्रेड सेंटर

मॅनहटन – न्यू यॉर्कच्या क्षितिजरेषेवर उठून दिसणारे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन महाप्रचंड  टॉवर ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी संघटनेने अतिशय भयानक रितीने उध्वस्त केल्याच्या घटनेला आज ११ वर्षे लोटली असतानाच या जागेजवळच पुन्हा एकदा उभारल्या जात असलेल्या १०५ मजली वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीत पुढील वर्षापासून म्हणजे २०१३ सालापासून पुन्हा कामकाज सुरू होणार आहे. विसरू म्हटले तरी न विसरता येणार्‍या या घटनेत न्यूयॉर्कची रिती झालेली क्षितिजरेषा पुन्हा एकदा या टॉवरच्या अस्तित्वाने थोड्या रूपात का होईना पण झळकणार आहे. अर्थात त्यासाठी अमेरिकावासियांना एक तपभर प्रतीक्षा करावी लागली आहे.

वर्ल्ड ट्रेड सेंटरची स्मृती जागविण्यासाठी त्या जागी बांधलेले दोन पूल अमेरिकावासियांचे श्रद्धास्थान बनले आहेत. या जागेवर दर वर्षी ११ सप्टेंबरला भेट देऊन या हल्यात हरविलेल्या आपल्या जिवलगांच्या स्मृती नागरिक जागृत करतात. या जागी पुन्हा इमारत बांधणे शक्यच नसल्याने या जागेच्या जवळच नवे वर्ल्ड ट्रेड सेंटर उभे केले गेले आहे. सतत चार वर्षे सुरू असलेल्या या कामात बांधकाम कामगारांची जितके श्रम केले तितकेच प्रसारमाध्यमांनीही या इमारतीच्या बांधकाम प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले. त्यातून ९७७ फूट उंचीची ही १०५ मजली इमारत उभी राहिली आहे.

ही इमारत पूर्णत्वास गेली की तिच्या खिडक्यंतून वर्ल्ड ट्रेड सेंटरचे स्मारक दिसू शकणार आहे असे सिल्वरस्टेन प्रॉपर्टीजचे उपाध्यक्ष मॅक्लीन यांनी सांगितले. ते म्हणाले की नवे वर्ल्ड ट्रेड सेंटर ही न्यूर्यार्कमधली सर्वोत्तम वास्तूरचना ठरावी असा प्रयत्न केला गेला आहे. कदाचित ही इमारत पूर्वीच्या सेंटरपेक्षाही अधिक देखणी असेल. लोअर मॅनहटन भागात ही इमारत आहे आणि सर्व काही अपेक्षेप्रमाणेच झाले आहे असे म्हटता येणार नसले तरी आम्ही पुन्हा ताठ उभे आहोत ही भावनाच मोठी आनंदाची आहे.

Leave a Comment