निवडसमिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मोहिंदर बाहेर

नवी दिल्ली: टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मोहिंदर अमरनाथ बाहेर पडले असून अध्यक्षपदाची माळ रॉजर बिन्नी यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत.

अमरनाथ यांना मागील वर्षी उत्तर विभागाच्या निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदावरून के. श्रीकांत पायउतार होताच त्या जागेवर अमरनाथ यांची निवड होण्याची शक्यता गृहीत धरली जात होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ यांचा महेंद्रसिंग धोनी याला कसोटी संघाचा कर्णधार ठेवण्यास विरोध होता. त्याला केवळ एक दिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधार पद द्यावे असे अमरनाथ यांचे मत होते. मात्र श्रीकांत यांचा धोनीला पाठींबा होता.

Leave a Comment